जिओग्रीन म्हणजे तुमचे नेहमीचे सेंद्रिय खत नाही. ते आहे तुमच्या मातीला पुनरुज्जीवित करण्यासाठी केलेले शास्त्रीय संशोधनाचे यश! सेंद्रिय कार्बन भरपूर प्रमाणात असलेले हे खत निरोगी मातीसाठीचा आधार आहे आणि जिओग्रीन तुमच्या निस्तेज पिकांना नवसंजीवनी प्राप्त करून देते. कार्बन आणि नायट्रोजन यांचे १०:१ या प्रमाणात असलेल्या मिश्रणामुळे तुमच्या पिकांच्या बहारदार कापणी/काढणीसाठी आवश्यक असलेले पोषण नेमक्या प्रमाणात प्राप्त करून देण्याची खातरजमा करते.
त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण फार्म्युल्यामुळे सामूची पातळी नियंत्रित केली जाते, मातीची रचना सुधारते आणि पाणी आणि पोषक घटक धरून ठेवण्याची क्षमता वाढते. हा सर्वंकष दृष्टिकोन तुमच्या मातीच्या छुप्या संभाव्य क्षमतेला समोर आणतो व त्यामुळे तुमच्या पिकांचे पोषण करण्याची तिची क्षमता जास्तीतजास्त वाढते. कच्चा माल आणि लाभदायक सूक्ष्मजीव यांचे आम्ही केलेले प्रोप्रायटरी मिश्रण व त्याला दिलेली विज्ञानाची जोड यामुळे तुमच्या मातीतील नैसर्गिक वाढ करण्याच्या शक्तीला चालना देते.
जिओग्रीन म्हणजे फक्त मातीतील सुधारणा नाही, तर तो आहे मातीच्या आरोग्याकडे पाहण्याचा क्रांतिकारी दृष्टिकोन, ज्यामुळे भरपूर पीक प्राप्त करता येते.
पिकांच्या वर्गवारीनुसारची शिफारस खाली दिलेली आहे:
पिक | मात्रा | |
किग्रॅ/एकर | गोणी (५० किलो)/एकर | |
तृणधान्ये (तांदूळ, गहू, मका, ज्वारी, इत्यादी), द्विदल धान्ये (लाल हरभरा, काळा हरभभरा, हिरवा हरभरा, इत्यादी) आणि तेलबिया (शेंगदाणा, सोयाबीन, तीळ, मोहरी, मेंथा, इत्यादी) | ५०० | १० |
कांदा, जिरे आणि भाज्या (टोमॅटो, मिरची, गाजर, मुळा, भेंडी, वांगे, ढोबळी मिरची, कोबी, फुलकोबी, वाटाणे, इत्यादी) | ५०० | १० |
आले, हळद, बटाटे, तंबाखू, अननस, कलिंगड | १००० | २० |
फळपिके (सफरचंद, केळी, लिंबूवर्गीय फळे, आंबा, लिची, पिअर, पेरू, पपई, डाळिंब, इत्यादी) | १००० - १२०० | २० ते २४ |
लागवडीची पिके (सुपारी, वेलदोडा, रबर, कॉफी, चहा, इत्यादी) आणि ऊस. | १५०० | ३० |
जिओग्रीन आणि रॅलिगोल्ड हे एकत्रितपणे तुमच्या शेतातील संभाव्य क्षमतेला मुक्त करण्यासाठीची गुरुकिल्ली आहेत.
पिकांच्या निरोगी वाढीसाठी परिपूर्ण आधार पुरवून जिओग्रीन तुमच्या मातीला समृद्ध बनवते.
रॅलिगोल्डमुळे मुळांची वाढ आणि पिकांचा विकास उत्तम प्रकारे होतो.
प्रिय शेतकरी बंधुंनो, नवकल्पना आणि शाश्वततेचा अंगीककार करा जिओग्रीन आणि रॅलिगोल्ड आहेत तुमच्या मातीचे व मुळांचे रक्षक, ज्यामुळे मिळते भरपूर पीक आणि हरित भविष्य!
अधिक हिरव्या भवितव्याची लागवड करण्यासाठी आमच्यात सामील व्हा. येणाऱ्या पिढ्यांसाठी चिरकाल टिकणारी माती निर्माण करून विपुलतेचे बियाणे पेरू या.
तुमच्या मातीचे सक्षमीकरण करा तुमची पालेमुळे उंचवा जिओग्रीन आणि रॅलिगोल्डच्या साह्याने भरभराट करा