रॅलिगोल्ड

रॅलिगोल्ड हे जैविक खतापेक्षा अधिक काहीतरी आहे, ते आहे तुमच्या पिकांसाठी चँपिअन! मायकोरायझा ह्या शक्तिशाली नैसर्गिक घटकाने भरलेले रॅलिगोल्ड हे पिकांच्या वाढीची काळजी घेते.

मायकोरायझा हे मातीत लपलेला खजिना मुक्त करते आणि तुमच्या पिकांना अधिक प्रमाणात पाणी आणि पोषक घटक, विशेषत: फॉस्फरस उपलब्ध करून देते परिणामस्वरूपी तुम्हाला मिळते पिकाची मजबूत आणि निरोगी वाढ.

तुमच्या पिकाने पाणी आणि पोषक घटक अवशोषण करण्याचे प्रमाण वाढवून रॅलिगोल्ड त्यांना पर्यावरणातील (अजैविक) आणि जीवशास्त्रीय (जैविक) ताणतणावाचा सामना करून सर्व प्रकारच्या विपरीत परिस्थितीत तग धरून राहण्यास मदत करते.

रॅलिगोल्ड जीआरसाठी पिकाच्या संवर्गानुसार शिफारस:

पीक वापर करण्याची वेळ प्रतिएकर दर (किग्रॅ/एकर)
तांदूळ / भात / धान प्रत्यारोपण (लावणी) केलेला: लागवडीनंतर १० ते १५
ओला आणि सुका पेरणी केलेला: पेरणीनंतर २० ते २५ दिवस
४ किग्रॅ / एकर
टोमॅटो, मिरची, बटाटा, कपाशी, मका, गहू, कांदा, लसूण, सोयाबीन आणि तेलबिया, द्विदल धान्ये आणि इतर भाज्या लागवड किंवा पेरणी करण्याच्या त्वरित आधी ४ किग्रॅ / एकर
ऊस, आले, हळद, केळी (खड्डे) जमिनीची अंतिम मशागत ८ किग्रॅ / एकर
द्राक्षे, डाळिंब, सुपारी, लिंबूवर्गीय फळे सेंद्रिय खतासोबत / बेसल डोससोबत ८ किग्रॅ / एकर
सफरचंद फेब्रु./मार्च ८ किग्रॅ / एकर

रॅलिगोल्ड एसपीसाठी पिकाच्या संवर्गानुसार शिफारस:

वापरण्याची पद्धत शिफारस केलेली पिक प्रमाण वापरण्याची वेळ
बीजप्रक्रिया कपाशी १० ग्रॅम / किग्रॅ बियाणे पेरणीपूर्वी
रोपे बुडविणे भाज्या (टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगे, कोबी, फुलकोबी, इत्यादी), तांदूळ एक लीटर पाण्यात ५-१० ग्रॅम लागवडीपूर्वी
आळवणी भाज्या (टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, वांगे, कोबी, फुलकोबी, इत्यादी)
कुकर्बिट्‌स (कर्कटी कूल) (कलिंगड, टरबूज, काकडी, भोपळे, इ.)
१५० ग्रॅम प्रतिएकर फुले येण्यापूर्वी/गरजेनुसार
ठिबकसिंचन द्राक्षे १५० ग्रॅम प्रतिएकर छाटणी केल्यानंतर १०-१५ दिवसांनंतर पहिला वापर
छाटणी केल्यानंतर ५०-६० दिवसांनंतर दुसऱ्यांदा वापर
ठिबकसिंचन डाळिंब १५० ग्रॅम प्रतिएकर पहिल्यांदा सिंचन केल्यानंतर १०-१५ दिवसांनंतर पहिला वापर
पहिल्यांदा सिंचन केल्यानंतर ५०-६० दिवसांनंतर दुसऱ्यांदा वापर
केळी २०० ग्रॅम प्रतिएकर लागवड केल्यानंतर १०-१५ दिवसांनी पहिला वापर
लागवड केल्यानंतर ९०-९५ दिवसांनी दुसऱ्यांदा वापर
टोमॅटो १५० ग्रॅम प्रतिएकर लागवड केल्यानंतर १०-१५ दिवसांनी पहिला वापर
लागवड केल्यानंतर ५०-६० दिवसांनंतर दुसऱ्यांदा वापर
ठिबकसिंचन कलिंगड/टरबूज १०० ग्रॅम प्रतिएकर पेरणी केल्यानंतर १०-१५ दिवसांनी पहिला वापर
पेरणी केल्यानंतर ३५-४० दिवसांनी दुसऱ्यांदा वापर
ऊस १५०-२०० ग्रॅम प्रतिएकर लागवडीनंतर १०-१५ दिवसांनी पहिला वापर
लागवडीनंतर ५०-६० दिवसांनी दुसऱ्यांदा वापर
फवारणी मिरची, ढोबळी मिरची, वांगे १०० ग्रॅम प्रतिएकर लागवडीनंतर ४०-४५ दिवसांनी
फवारणी भोपळे १०० ग्रॅम प्रतिएकर पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी

तुमच्या शेतातील संभाव्य क्षमतेला मुक्त करा: जिओग्रीन आणि रॅलिगोल्ड यांची एकत्रित किमया

जिओग्रीन आणि रॅलिगोल्ड हे एकत्रितपणे तुमच्या शेतातील सुप्त क्षमतेला मुक्त करण्यासाठीची गुरुकिल्ली आहेत

पिकांच्या निरोगी वाढीसाठी परिपूर्ण आधार पुरवून जिओग्रीन तुमच्या मातीला समृद्ध बनवते.

रॅलिगोल्डमुळे मुळांची वाढ आणि पिकांचा विकास उत्तम प्रकारे होतो.

  • मातीची गुणवत्ता आणि जैविक प्रक्रिया यांमध्ये वाढ
  • खतांच्या परिणामकारकतेत आणि जलसंधारणेत वाढ
  • पर्यावरणीय आणि जैविक ताणतणावाच्या प्रतिकारासह अधिक मजबूत पिके
  • पिकाच्या गुणवत्तेत आणि प्रमाणात वाढ

प्रिय शेतकरी बंधुंनो, नवकल्पना आणि शाश्वततेचा अंगीककार करा जिओग्रीन आणि रॅलिगोल्ड आहेत तुमच्या मातीचे व मुळांचे रक्षक, ज्यामुळे मिळते भरपूर पीक आणि हरित भविष्य!

अधिक हरित भवितव्याची लागवड करण्यासाठी आमच्यात सामील व्हा. येणाऱ्या पिढ्यांसाठी चिरकाल टिकणारी माती निर्माण करून विपुलतेचे बियाणे पेरूया.

तुमच्या मातीचे सक्षमीकरण करा तुमची पाळेमुळे घट्ट करा, जिओग्रीन आणि रॅलिगोल्डच्या साह्याने भरभराट करा.

icon आताच चौकशी करा