भारताच्या ग्रामीण भागात, जेथे ‘‘माती’’ ही शेतीची जीवनवाहिनी असते, तेथे एक मूक संकट समोर येत आहे - ह्या अमूल्य नैसर्गिक स्रोताचा सातत्याने ऱ्हास होत आहे. मातीकडे खरोखरच ‘‘अंतर्गत जीवनाचा आत्मा’’ म्हणून पाहिले जाते. म्हणून मातीच्या आरोग्याचे संवर्धन करणे आणि आपल्या पुढील पिढ्यांना अधिक चांगल्या दर्जाची माती हस्तांतरित करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. सेंद्रिय खताच्या आणि जैविक साधनांचा पुरेशा वापराचा अभाव; आणि पोषक घटकांचा असमतोल वापर करण्याची पद्धत ही मातीच्या आरोग्याचा ऱ्हास होण्याची प्रमुख कारणे आहेत. कालांतराने खताच्या वापराला मिळणारा प्रतिसाद कमी होतो, पिकासाठी लागणारे वाढीव सिंचन आणि गांडुळांची कमी प्रमाणात दिसणारी संख्या हे मातीतील कमी झालेल्या रासायनिक, भौतिक आणि जैविक आरोग्याचे नमुनेदार निदर्शक आहेत.
दुसरीकडे आपल्या देशातील अन्नाची आणि पोषणासुरक्षिततेकरिता दर्जेदार अन्नाची मागणी सतत वाढत आहे. यासाठी पोषक घटक पुरविण्यासाठी आणि शेतीच्या शाश्वात वाढीची खातरजमा करण्यासाठी आधार म्हणून निरोगी आणि चैतन्यपूर्ण मातीची आवश्यकता असते. मातीच्या आरोग्याचा खालावणारा दर्जा दर्जेदार पिकाच्या उत्पादनावर परिणाम करीत आहे आणि शेतीपासून मिळणारे उत्पन्न कमी करीत आहे. प्रत्येक बी आणि तिच्यातून बाहे पडणारे प्रत्येक मूळ अधिक निरोगी पिकाचे वचन देतात; आणि इंटिग्रेटेड प्लँट न्यूट्रिअंट मॅनेजमेंट (आयपीएनएम) हेच हे वचन पूर्ण करण्यासाठीचे शाश्वत धोरण आहे. ‘सेंद्रिय खत’ आणि ‘जैविक खत’ हे या धोरणाचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहे, ज्यामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि त्या मातीत वाढणाऱ्या मुळांचे आरोग्य अधिक चांगले होते. सेंद्रिय कार्बन हा मातीत सुधारणा होण्यासाठी पायाचा दगड आहे - त्यामुळे मातीच्या रचनेला स्थैर्य येते, जलसंधारणात सुधारणा होते, मातीचा सामू जवळपास तटस्थतेपर्यंत स्थिर होतो, मातीच्या वातावरणात टोकाचे बदल होण्यास आळा घातला जातो, फायदेशीर ठरणारे सूक्ष्म जिवांची संख्या वाढते आणि रोपासाठी उपलब्ध असलेले पोषक घटक वाढवले जातात. म्हणून दर्जेदार सेंद्रिय खताची उपलब्धता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उपलब्ध असलेल्या पोषक घटकांची जैव-खतांमुळे हालचाल होते आणि त्यांना रोपाचे पोषण करणाऱ्या निरोगी मुळांजवळ आणले जाते.
आमच्या ‘‘विज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा’’ ह्या मिशनला पाठिंबा म्हणून निरोगी मातीत निरोगी मुळांच्या वाढीची खातरजमा करण्यासाठी रॅलिस अभिमानाने तुमच्यासाठी दोन शक्तिशाली सोल्युशन्स घेऊन येत आहे. जिओग्रीन® हे आपल्या देशातील एकमेव पेटंट घेतलेले आणि शास्त्रीय पद्धतीने समृद्ध केलेले सेंद्रिय खत आहे, ज्यामुळे तुमच्या मातीच्या आरोग्यात सुधारणा होण्याची खातरजमा होते आणि आमच्या शिफारसीनुसार वापर केल्यास दीर्घकाळपर्यंत टिकते. रॅलिगोल्ड® हे रोपांची मुळे पोहोचू शकत नाहीत, तेथे रोपांना मातीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आणि पोषक घटकांच्या उपलब्धतेची खातरजमा करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेले मायकोऱ्हीझल जैव-खत आहे. मुळांचे आरोग्य सुधारण्यासाठी वाढीला चालना देणाऱ्या घटकांनी त्याची शक्ती वाढविण्यात आलेली आहे. तुमच्या शेतात नवीन पीक घेण्याच्या सुरुवातीस या दोहोंचा एकत्रितपणे वापर करणे सुरू करा आणि शाश्वत आणि भरभराट होणाऱ्या शेतीचा आनंद घ्या.